गावाविषयी माहिती
वैतरणा नदीच्या काठी वसलेले गालतरे गाव हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. गालतरे गावात पश्चिममुखी श्री गणेश मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू तसेच गावाच्या उत्तर हद्दीला आई गावदेवी गालतरे मंदिर व गावाच्या दक्षिणेस आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत सोसायटी ( इस्कॉन ) संचालित श्री गोवर्धन एको व्हिलेज ,गालतरे संस्थापित श्री श्री राधा वृन्दावन बिहारी मंदिर तसेच पूर्वेस कोहोज किल्ला पर्वत हि आकर्षक पर्यटन स्थळे सुद्धा आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २४७४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2, अंगणवाडी केंद्रे 3, लघुउद्देषीय केंद्र -1 व समाज मंदिर -2 , श्री गोवर्धन एको व्हिलेज , गालतरे संस्थापित गोवर्धन स्कील सेंटर , गालतरे अशा शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात हे प्रमुख पिक घेतले जाते. हरभरा, मुग, उडीद, तूर हि काही जोड पिके भात कापणी केल्यानंतर घेतली जातात. तसेच थोड्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात.
गालतरे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालाय चा लाभ मिळाला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व 8 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.